स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींच्या पाचगणी येथील वास्तव्याच्या स्मृती हा पाचगणीकरच नव्हे, तर महाराष्ट्रवासीयांसाठी एक अभिमानाचा क्षण नी आठवणींचा ठेवा. या सुखद स्मृतींचा सुगंध जतन करण्याच्या हेतूने पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी टाकाऊ बांधकाम साहित्य वापरून गांधीजींच्या 8 फूट उंच प्रतिमेची निर्मिती करण्याच्या संकल्प केला. त्यामुळे इमारत बांधकामातील भंगार, टाकाऊ सामान, राडारोडा यांचा पुनर्वापर करून गांधीजींचे आणि स्वच्छतेचे असलेले सर्वश्रूत नाते अधोरेखित केले आहे.
पाचगणी : स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींच्या पाचगणी येथील वास्तव्याच्या स्मृती हा पाचगणीकरच नव्हे, तर महाराष्ट्रवासीयांसाठी एक अभिमानाचा क्षण नी आठवणींचा ठेवा. या सुखद स्मृतींचा सुगंध जतन करण्याच्या हेतूने पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी टाकाऊ बांधकाम साहित्य वापरून गांधीजींच्या 8 फूट उंच प्रतिमेची निर्मिती करण्याच्या संकल्प केला. त्यामुळे इमारत बांधकामातील भंगार, टाकाऊ सामान, राडारोडा यांचा पुनर्वापर करून गांधीजींचे आणि स्वच्छतेचे असलेले सर्वश्रूत नाते अधोरेखित केले आहे.
अलीकडे पाचगणी पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात आपले स्थान देशात अव्वल राखले आहे.त्यामुळे गांधीजींच्या स्मृतींचे विरळे शिल्प आणि पाचगणीकरांच्या स्वच्छताप्रेमाची साक्ष या दोन्ही गोष्टी पर्यटकांना पटणार आहेत. स्वच्छ सुंदर, रमणीय पाचगणीचे ते विलोभनीय वैशिष्ट्य ठरणार आहे.
जागतिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असणार्या पाचगणी शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी पालिकेने टाकाऊपासून बनवलेल्या टिकाऊ शोभेच्या प्रतिकृती नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून, या प्रतिकृतींमुळे शहराचे रूपडे पालटले आहे.
पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणासह ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत शहरात अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे. ‘वेस्ट टू बेस्ट’चा नारा देत शहरात सुंदर आरास उभी करत आहेत. या सर्व कलाकृती नागरिकांसाठी खुल्या असून, पर्यटकांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे ‘वेस्ट टू बेस्ट’मध्ये पालिका ‘बेस्ट’ ठरत आहे. आरोग्य साहित्यापासून व ठिबकच्या पाईपपासून केलेल्या कलाकुसरीमधून टाकाऊ कचर्यालाच सुंदर आकार मिळत आहे. खराब टाकाऊ वस्तूंपासून वाघ, हरिण, उंट, झाडे लावण्यासाठी कुंड्या तयार केल्या आहेत. हे शिल्प साकारण्यासाठी भंगार, प्लास्टिकचे डबे, बाटल्या, खराब लोखंडी व टायरचा वापर केला आहे.