‘वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नाची गरज वाढली आहे. ती पूर्ण करण्यासाठी शेतकरी मर्यादेपेक्षा जास्त रासायनिक खतांचा वापर करत आहेत. त्यामुळे जमीन नापीक होत चालली आहे. मातीतील मूलद्रव्यांचे प्रमाण कमी झाल्याने मातीचा कस कमी होत चालला आहे. मातीत मीठ फुटण्याचे प्रकार घडतात, मातीची उगवण क्षमता, मातीचा कस, उत्पादन क्षमता कमी होतेय त्यामुळे माती परीक्षण ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन रत्नाई कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी अक्षय सत्रे याने केले.
बिजवडी : ‘वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नाची गरज वाढली आहे. ती पूर्ण करण्यासाठी शेतकरी मर्यादेपेक्षा जास्त रासायनिक खतांचा वापर करत आहेत. त्यामुळे जमीन नापीक होत चालली आहे. मातीतील मूलद्रव्यांचे प्रमाण कमी झाल्याने मातीचा कस कमी होत चालला आहे. मातीत मीठ फुटण्याचे प्रकार घडतात, मातीची उगवण क्षमता, मातीचा कस, उत्पादन क्षमता कमी होतेय त्यामुळे माती परीक्षण ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन रत्नाई कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी अक्षय सत्रे याने केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित, रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज अंतर्गत कृषिदुताने तोंडले, ता. माण येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांतर्गत कृषिदूत अक्षय सदाशिव सत्रे याने शेतकर्यांना माती परीक्षणाचे नमुने घेण्याचे प्रात्यक्षिक सादर करून जमिनीच्या सुपीकतेबद्दल शेतकर्यांना माहिती दिली.
यासाठी शि. प्र. मंडळ अकलूजचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी. कोरटकर, प्राचार्य आर. जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एम, एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. आर. अडत, प्रा. डी. एस. मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी प्रगतशील बागायतदार लव्हाजी कदम, कृषीमित्र मयूर कदम व स्वप्नील सत्रे तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.