माणदेशी शेतकरी कांद्याचे भाव घसरल्याने हवालदिल

हळव्याला अवकाळीचा फटका; शेतकर्‍याचा जमा-खर्चाचा ताळमेळ जुळेना
Published:Apr 10, 2021 02:46 PM | Updated:Apr 10, 2021 02:46 PM
News By : Muktagiri Web Team
माणदेशी शेतकरी कांद्याचे भाव घसरल्याने हवालदिल

माण तालुक्यात शेतकर्‍यांचे नगदी पीक म्हणून कांद्याला ओळखले जाते. शासनाने नुकताच मिनी लॉकडाऊन जाहीर केला अन् शेतकर्‍यांनी मार्केटला कांदा विक्रीसाठी आणला. या कांद्याची अचानक आवक वाढल्याने कांद्याचा भाव घसरला असल्याने पुन्हा कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या एक हजाराच्या आत भाव आला असल्याने जमा खर्चाचा ताळमेळ जुळेनासा झाला आहे.