‘शेनवडी व परिसरातील सर्वच ठिकाणी माणस्वदेश फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकर्यांना रेशीम शेतीकडे शाश्वत शेती म्हणून पाहावे. त्यासाठी विशेष प्रयत्न सुरू ठेवणार आहे. त्याशिवाय संस्थेच्या माध्यमातून शेती, मार्केट, बी बियाणे, अवजारे यावर काम केलेच जाईल, पण याशिवाय येत्या काळात माती परीक्षण करून शेतीमधील मुख्य घटक ओळखून पिके घेण्यासाठी येत्या काळात जास्तीत जास्त काम केले जाईल. शिवाय शेतकर्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समुपदेशन कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार. येत्या काळात मा
म्हासुर्णे : ‘शेनवडी व परिसरातील सर्वच ठिकाणी माणस्वदेश फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकर्यांना रेशीम शेतीकडे शाश्वत शेती म्हणून पाहावे. त्यासाठी विशेष प्रयत्न सुरू ठेवणार आहे. त्याशिवाय संस्थेच्या माध्यमातून शेती, मार्केट, बी बियाणे, अवजारे यावर काम केलेच जाईल, पण याशिवाय येत्या काळात माती परीक्षण करून शेतीमधील मुख्य घटक ओळखून पिके घेण्यासाठी येत्या काळात जास्तीत जास्त काम केले जाईल. शिवाय शेतकर्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समुपदेशन कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार. येत्या काळात माणस्वदेश फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सर्व सभासदांना कृषी विज्ञान केंद्रामध्ये सल्ला व प्रशिक्षण देण्यात येणार आहे,’ अशी माहिती माणस्वदेश फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक विजय कोकाटे यांनी दिली.
माणस्वदेश फार्मर प्रोड्युसर कंपनी व जिल्हा रेशीम उद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने महारेशीम अभियानाच्या चर्चा सत्रात आज शेनवडी आणि आजूबाजूच्या निमसोड, रहाटणी, म्हासुर्णी, चोराडे या परिसरातील शेतकर्यांना रेशीम शेती व त्याबाबतीत सर्व माहिती देेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.
कांबळे यांनी सांगितले की, रेशीम उद्योग हा माण व खटाव तालुक्यांतील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठीचा एक अनमोल पर्याय म्हणून ही शेती करावी. यासाठी सर्वतोपरी प्रशिक्षण व मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
तसेच रेशीम शेतकरी युवराज गाडे माण तालुका, तुषार माने-देशमुख यांनी आपली मनोगत व्यक्त केली व शेतकर्यांना रेशीम शेतीची सखोल माहिती दिली.
या कार्यक्रमास विजय कोकाटे, जिल्हा रेशीम अधिकारी कांबळे, माजी सरपंच राजू घाडगे, माजी सरपंच रामचंद्र फडतरे, युवा कार्यकर्ते सुहास पिसाळ, तुषार माने, प्रवीण कोकाटे, दीपक पाटील, रवी घोडके, बबन माळी, रवी भोसले, हरी माळी, खंडू चव्हाण, नितीन घोडके, सविता साळुंखे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
श्रीमंत कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. अरुण दबडे यांनी आभार मानले.