नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडीनंतर खटाव-माण तालुक्यांतील 120 पैकी 68 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्निवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. तर काही ठिकाणी समविचारी पक्षांसोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्तेत असल्याची माहिती निवृत्त आयुक्त व खटाव माण राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
वडूज : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडीनंतर खटाव-माण तालुक्यांतील 120 पैकी 68 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्निवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. तर काही ठिकाणी समविचारी पक्षांसोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्तेत असल्याची माहिती निवृत्त आयुक्त व खटाव माण राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती जयश्री कदम-पाटील, उपसभापती हिराचंद पवार, मनोजदादा पोळ, सुभाष नरळे, श्रीराम पाटील, माणचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, नगराध्यक्ष सुनील गोडसे, विजय उर्फ मुन्ना खाडे, प्रा. कविता म्हेत्रे, माणचे उपसभापती तानाजी कट्टे, काटकर, ज्ञानेश्वर शिंदे, गोविंद पवार, प्रा. कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रवादीने वर्चस्व प्राप्त केलेल्या खटाव तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये अंबवडे, येळीव, लोणी, नांदोशी, कणसेवाडी, मानेवाडी (तुपेवाडी), डाळमोडी, गुंडेवाडी, तडवळे, नायकाचीवाडी, भुरकवडी, पेडगाव, जायगाव, पळशी, भोसरे, गुरसाळे, येरळवाडी, कातरखटाव, ढोकळवाडी, चितळी, तरसवाडी, उंबर्डे, गोसाव्याचीवाडी, गोपूज, नागाचे कुमठे, खबालवाडी, बोंबाळे, दातेवाडी, हिरवाडी, कलेढोण, मुळीकवाडी, वरूड, कारंडेवाडी, कळंबी या गावांचा समावेश आहे.
तर माण तालुक्यातील इंजबाव, काळचौंडी, किरकसाल, कुकुडवाड, खडकी, गोंदवले बुद्रुक, गोंदवले खुर्द, जांभुळणी, जाशी, डंगिरेवाडी, ढाकणी, दिवडी, देवापूर, धामणी, पर्यंती, पानवण, पिंगळी बुद्रुक, भाटकी, भालवडी, भांडवली, मार्डी, रांजणी, लोधवडे, वडजल, वरकुटे म्हसवड, वाकी, वारूगड, शिंदी खुर्द, शिंदी बुद्रुक, शिरवली, हवालदारवाडी या ग्रामपंचायती राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत.
तटस्थ राहणार्यांचेही स्वागत : प्रभाकर देशमुख
ग्रामपंचायत निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लढतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही एका पक्षाची भूमिका न घेता तटस्थ राहावे लागते. अशी तटस्थ राहण्याची ज्यांनी भूमिका घेतली आहे त्या पदाधिकार्यांचेही मनापासून स्वागत तसेच विकासकामांबरोबरच गावातील सलोख्याचे वातावरण कायम टिकविण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून सहकार्य राहील.
कराड उत्तर, कोरेगाव मतदार संघातील भागातही मुसंडी : प्रभाकर घार्गे
खटाव माण मतदार संघा व्यतिरीक्त खटाव तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती कराड उत्तर व कोरेगाव विधानसभा मतदार संघात आहेत, त्याठिकाणीही पक्ष कार्यकर्त्यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. कराड मतदार संघातील बहुतांशी गावे राष्ट्रवादीमय झाली आहेत. तर कोरेगाव मतदार संघातील खटाव, पुसेगाव गटातील अनेक ग्रामपंचायतीवर पक्षाचा झेंडा फडकला आहे.
उपसभापती हिराचंद पवार यांनी आभार मानले.