तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूरमध्ये महिलांनी गौराईचा आगमन पूजन सोहळा उत्साहात साजरा केला. याप्रसंगी शिंगणापूरमधील काही महिलांनी गौराई सणात समाज प्रबोधन, धार्मिक स्थळे, विवाह सोहळा, पर्यावरण समतोल, पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, प्रदूषणमुक्त परिसर संकल्पना, श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व पारंपरिक जुन्या रूढी-परंपरा, तसेच कोरोना बचाव देखावा असे सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले होते.
शिखर शिंगणापूर : तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूरमध्ये महिलांनी गौराईचा आगमन पूजन सोहळा उत्साहात साजरा केला. याप्रसंगी शिंगणापूरमधील काही महिलांनी गौराई सणात समाज प्रबोधन, धार्मिक स्थळे, विवाह सोहळा, पर्यावरण समतोल, पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, प्रदूषणमुक्त परिसर संकल्पना, श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व पारंपरिक जुन्या रूढी-परंपरा, तसेच कोरोना बचाव देखावा असे सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले होते.
यामध्ये कुंभारवाड्यातील अरुणा व सुरेखा कुंभार यांनी विवाह सोहळ्याचा देखावा, प्रतिभा व अर्चना चौधरी यांनी श्रीकृष्ण जन्म सोहळा, आशा व भाग्यश्री शेटे यांनी पारंपरिक जुन्या रूढी-परंपरा, सरस व गौरी कर्चे यांनी झाडे लावा झाडे जगवा, कल्पना व प्रमिला भागवत यांनी निसर्गरम्य धबधबा, मंजुश्री तोडकर यांनी पर्यावरणपूरक संदेश तसेच धार्मिक स्थळांचा संदेश देणारा देखावा स्मिता बडवे व वैष्णवी इनामदार यांनी उभारला आहे.
कोरोनामुळे मंदिर बंद अवस्था, निसर्गाच्या जलचक्राची साखळी, पर्यावरण समतोल, प्रदूषणमुक्त गाव, विविध धार्मिक सोहळ्यांच्या देखाव्यातून सामाजिक, नैसर्गिक, धार्मिक संदेश देण्याबरोबर रूढी-परंपरांचे प्रतीक जतन करणारी संकल्पना महिलांनी साकारली होती.
गौराई सणाच्या निमित्ताने घरामध्ये प्रसन्न व नवचैतन्य निर्माण करणारे वातावरण पाहावयास मिळते. तसेच या सणातून सामाजिक सलोखा जपला जातो. एकूणच समाजाच्या जडणघडणेत महिला वर्गाचे समाजाभिमुख संकल्पनेचे दर्शन यानिमित्ताने घडत आहे.
स्त्री शक्तीच्या कार्याला सलाम..!
आपली संस्कृती जोपासणे व टिकवण्याची मोठी जबाबदारी महिला वर्गावर आहे. येणारा प्रत्येक सण हा थाटामाटात व उत्साहात साजरा करणे तोही पुरणपोळी नैवेद्यासह. हक्क व कर्तव्यदक्ष राहून कौटुंबिक उत्साह जोपासण्याची कला फक्त महिलांकडेच असते. म्हणूनच खर्या अर्थाने स्त्री शक्तीच्या कार्याला सलामच केला पाहिजे.