पाडळीस्टेशन-सातारारोड, ता. कोरेगाव येथे विना मास्क फिरणार्यांवर सातारारोड पोलिसांनी कारवाई करून पाच हजारांचा दंड वसूल केला आहे.
सातारारोड : पाडळीस्टेशन-सातारारोड, ता. कोरेगाव येथे विना मास्क फिरणार्यांवर सातारारोड पोलिसांनी कारवाई करून पाच हजारांचा दंड वसूल केला आहे.
दिवसेंदिवस कोरेगाव तालुक्यातील अनेक गावांत कोरोनाचेे पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. मंगळवार, दि. 8 पासून संपूर्ण सातारारोड बाजारपेठ नागरिकांनी व व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने पाच दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्धार केला आहे.
शासन, आरोग्य विभाग, सामाजिक संस्था वारंवार जनतेला आवाहन करत आहेत की, बाहेर फिरताना मास्कचा वापर करा, कामाशिवाय घराबाहेर पडू नका, तरीही काही नागरिक विनामास्क घराबाहेर पडत आहेत. यामुळे कोविड आजाराचा प्रसार झपाट्याने होऊ शकतो.
याबाबत कडक उपाययोजना करत सातारारोड पोलिसांनी मोटरसायकलवर विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई करून एकूण पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दंडात्मक कारवाईचा आता अनेकांनी धसका घेतला आहे.
सातारारोड पोलिसांनी केलेल्या या कडक कारवाईचे नागरिकांनी कौतुक केले आहे.