‘अंबवडे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस विचारानेच कार्यरत राहणार आहे,‘ अशी ग्वाही पॅनेलप्रमुख प्रकाशशेठ नलवडे यांनी दिली.
निमसोड : ‘अंबवडे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस विचारानेच कार्यरत राहणार आहे,‘ अशी ग्वाही पॅनेलप्रमुख प्रकाशशेठ नलवडे यांनी दिली.
नवनिर्वाचित सरपंच वैशाली पवार, उपसरपंच सचिन पाटोळे तसेच सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी वि.का.स.सोसायटीचे अध्यक्ष दत्ता पवार, माजी सरपंच अंकुशराव पवार, संभाजी पवार, सोमनाथ बुधे, डॉ. सोपान पवार, शिवाजीराव नलवडे, भिमराव खिलारे, संतोष पवार, प्रकाश पवार, विश्वजीत घाडगे, पी. जी. पाटोळे, विजय पवार, राजेंद्र जाधव, सुभाष जाधव, अशोक जाधव, बरकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नलवडे म्हणाले, ‘अंबवडे हे गाव पवार कुटुंबीयांवर मनापासून प्रेम करणारे आहे. तसेच गावामध्ये आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. त्यामुळे यापुढच्या काळातही ग्रामपंचायतीचे सर्वच पदाधिकारी पक्षाच्या विचारधारेप्रमाणे कार्यरत राहतील.
दरम्यान, नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य आनंदा पवार, श्रीकांत धर्माधिकारी, सुशिला जाधव, मंगल बुधे, डॉ. शिंदे, यांचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी आ. प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, जितेंद्रदादा पवार, संदीपदादा मांडवे, प्रा. बंडा गोडसे, सभापती जयश्री कदम-पाटील, उपसभापती हिराचंद पवार आदींसह तालुक्यातील मान्यवरांनी अभिनंदन केले.