सातारा येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध वक्ते प्रा. श्रीधर साळुंखे यांना नाशिक येथील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या वसंत व्याख्यानमालेत मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून व्याख्यानमालेचे यंदाचे ९९ वे वर्ष आहे. प्रा. साळुंखे यांचे व्याख्यान दि. २० मे रोजी नाशिक येथील गोदाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगणात होईल. "मानवी जीवनातील संवादाचे महत्त्व" या विषयावर प्रा. साळुंखे मार्गदर्शन करणार आहेत.
सातारा : सातारा येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध वक्ते प्रा. श्रीधर साळुंखे यांना नाशिक येथील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या वसंत व्याख्यानमालेत मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून व्याख्यानमालेचे यंदाचे ९९ वे वर्ष आहे. प्रा. साळुंखे यांचे व्याख्यान दि. २० मे रोजी नाशिक येथील गोदाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगणात होईल. "मानवी जीवनातील संवादाचे महत्त्व" या विषयावर प्रा. साळुंखे मार्गदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात वसंत व्याख्यानमालांची देदीप्यमान पंरपरा असून नाशिक येथील वसंत व्याख्यानमाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजअखेर अखंड सुरू आहे. या व्याख्यानमालेत राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, जयप्रकाश नारायण, प्रबोधनकार ठाकरे या महान नेत्यांची व्याख्याने झाली आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, जयंत नारळीकर अशा महान प्रभुतींनी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले आहेत. प्रा. श्रीधर साळुंखे यांच्या रूपाने साताऱ्याला सदर व्याख्यानमालेत मार्गदर्शनाची संधी मिळाली आहे.
विविध वृत्तवाहिन्यांवर या व्याख्यानमालेचे प्रक्षेपण करण्यात येणार असून यूट्यूबच्या माध्यमातून http://youtube.com/c/omSaiLeelaTV/live या लिंकवरून या विचारयज्ञात आपणास सहभागी होता येणार आहे.