उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार माण कृषी बाजार उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू
जूनच्या शेवटी होणार निवडणूक ः मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
Published:May 25, 2021 03:33 PM | Updated:May 25, 2021 03:33 PM
News By : Muktagiri Web Team
दहिवडी ः माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर नेमण्यात आलेल्या प्रशासक मंडळाविरूध्द उच्च न्यायालयात अपिल करण्यात आले होते. यावर उच्च न्यायालयाने निकाल दिला असून त्यानुसार माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक प्रक्रिया होणार आहे. सध्या राज्यभर कोरोना संसर्गामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र उच्च न्यायालयाने निकाल दिलेल्या संस्थांच्या निवडणूका घेण्यात येत आहेत. त्यानुसार माण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून जुनच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे व महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या समितीची निवडणूक) नियम 2017 प्रारुप मतदार यादी अद्यावतीकरण कार्यक्रम संचालक मंडळ निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी अंतिम करणेचा कार्यक्रम जाहीर झाला असून यात माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. या समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात बाजार समितीच्या निवडणूकीचा बिगुल वाजणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक सौ.विजया बाबर यांनी दिली. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था. दहिवडी ता.माण व पंचायत समिती, दहिवडी या कार्यालयातील नोटीस बोर्डावरती दि.25 मे 2021 रोजी स. 11.00 वाजता प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करण्यात आली आहे.तर दि.25 मे 2021 ते दि.3 जून 2021 या काळात सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत यादीवर जिल्हा निवडणूक अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांचे कार्यालयातील जिल्हा निवडणूक कक्षात प्रारूप मतदार यादीवर दावे / हरकती आक्षेप दाखल करण्यात येतील.दि.14 जून 2021 रोजी प्राप्त दावे / हरकती आक्षेप यावर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा यांनी निर्णय देतील. दि.18 जून 2021 रोजी संस्था कार्यालय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, दहिवडी ता. माण/ पंचायत समिती दहिवडी व या कार्यालयातील नोटीस बोर्ड व या कार्यालयातील नोटीस बोर्डावरअंतिम मतदार यादी प्रसिध्दी करण्यात येणार असल्याचीही माहितीही सौ.विजया बाबर यांनी दिली.