अंबवडे फाटा येथील एटीएम अज्ञातांनी फोडले
कोरेगाव तालुक्यातील घटना: एटीएम मधील रक्कम वाचली
Published:2 y 2 m 7 hrs 20 min 11 sec ago | Updated:2 y 2 m 7 hrs 20 min 11 sec ago
News By : Muktagiri Web Team
कोरेगाव तालुक्यातील अंबवडे फाटा येथे हिताचीचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले असून ही घटना दि.६ एप्रिल रोजी पहाटे उघडीस आली.घटनास्थळी वाठार पोलिस स्टेशन टीम दाखल झाली असून पुढील तपास सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.चोरट्यांनी कलरचा स्प्रे सीसीटीव्ही कॅमेरावर मारला असून एटीएम मधील रक्कम वाचली आहे.मात्र चोरट्यांनी एटीएम मशीनचे नुकसान केले आहे.शनिवारी पहाटे 3 वाजल्याच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम मध्ये प्रवेश केला असल्याची प्राथमिक माहिती असून चोरट्यांनी एटीएमची तोडफोड केली आहे.घटनास्थळी वाठार पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक हुलगे व वाठार पोलीस टीम यांनी घटनास्थळाची पाहणी केली.