डांभेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किशोर चंद्रकांत बागल तर उपरसंपचपदी रघुनाथ विठ्ठल औताडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कातरखटाव : डांभेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किशोर चंद्रकांत बागल तर उपरसंपचपदी रघुनाथ विठ्ठल औताडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
निवडीप्रसंगी हेमलता हिंदुराव बागल, शोभा लक्ष्मण बागल, नवनाथ बाबूराव बनसोडे, मिराबाई शिवाजी बनसोडे, सोनाली ज्ञानेश खाडे आदी सदस्य उपस्थित होते.
विस्तार अधिकारी नाळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. निवडीप्रसंगी सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बागल, अॅड. प्रकाश नलवडे, माजी सरपंच कृष्णराव बनसोडे, महेश थोरवे, दादासाहेब बागल, हिंदुराव बागल, प्रकाश कुलकर्णी, तंटा मुक्तीचे अध्यक्ष कृष्णराव नलवडे, जयवंत बागल, शिवाजी नामदास, लक्ष्मण बागल, सुभाष बागल, विश्वनाथ बागल, कोंडिबा बनसोडे, बाबूराव बनसोडे, विलास बनसोडे, सोपान थोरवे, विक्रम बागल, सदाशिव औताडे, राजेंद्र औताडे, दादासाहेब नलवडे, सुहास बागल, राघवेंद्र जाधव, नंदकुमार पवार, ग्रामसेवक खरात आदी उपस्थित होते.
यावेळी माजी सरपंच बनसोडे यांनी नूतन पदाधिकारी व सदस्यांना शुभेच्छा देण्याबरोबर विकासकामासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. सरपंच बागल, उपसरपंच औताडे यांचे भाजपा तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, सदाभाऊ खाडे, रामभाऊ देवकर, विकल्प शहा, अनिल माळी, प्रदीप शेटे आदींनी अभिनंदन केले.