उत्तर कोरेगाव तालुक्यात बुधवारी झालेल्या गारपिटीने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भांडवली खर्च असलेली पिके पूर्णपणे वाया गेली असून, नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आ. दीपक चव्हाण यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर शेतकर्यांना दिले.
पिंपोडे बुद्रुक : उत्तर कोरेगाव तालुक्यात बुधवारी झालेल्या गारपिटीने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भांडवली खर्च असलेली पिके पूर्णपणे वाया गेली असून, नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आ. दीपक चव्हाण यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर शेतकर्यांना दिले.
बुधवारी दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने कलिंगड, गोट कांदा, ऊस, मिरची, भुईमूग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी आ. चव्हाण आले होते.
त्यावेळी कोरेगाव प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे, नागेशशेठ जाधव, पिंपोडे बुद्रुकचे सरपंच नैनेश कांबळे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके, मंडलाधिकारी उमेश डोईफोडे उपस्थित होते.
गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकर्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल, यासाठी महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचार्यांना प्रयत्न करावेत. त्यासाठी सरकार दरबारी आवश्यक असलेली सर्व मदत मी स्वतः तातडीने कार्यवाही करीन, अशी ग्वाही चव्हाण यांनी यावेळी उपस्थित शेतकर्यांना दिली.
यावेळी पिंपोडे बुद्रुक, वाठार स्टेशन, घिगेवाडी, अनपटवाडी या गावांतील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यात आली.
यावेळी तलाठी सुहास सोनावणे, धनसिंग साळुंखे, शेतकरी दिलीप लेंभे, हमीद इनामदार, इलाही इनामदार, शिवाजी निकम, अशोक निकम, माजी सरपंच मछिंद्र केंजळे,सोनके सरपंच संभाजी धुमाळ सरपंच, घिगेवाडी सरपंच आदिनाथ सावंत यांच्यासह अनेक नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
गारपिटीने झालेले नुकसान खूप मोठे आहे. शेतात अर्धा ते पाऊण फूट गारांचा थर साठला होता. त्यामुळे पिकं अक्षरशः नासून गेली आहेत. गारपीट झाल्याच्या दुसर्या दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत अनेक ठिकाणच्या गारा विरघळलेल्या नव्हत्या यावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते. गोट कांद्याच्या फुलांचा जमिनीवर खच पडला होता. तर ऊस पिकाच्या पानाच्या चिंध्या झाल्या आहेत.
निसर्गाचे हे तांडव शेतकर्यांना उघड्या डोळ्यानी पाहत रहावे लागले. लाखो रुपयांचा केलेला खर्च मातीमोल झाल्याने अनेक शेतकर्यांना अश्रू अनावर झाले होते. सरकारने भरीव मदत देऊन शेतकर्यांना उभारी द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत होते.