डाॅ.सदीप डाकवे यांचे ‘दीप उजळतो आहे’ हे तिसÚया क्रमांकाचे पुस्तक आहे. पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.शंभूराज देसाई व अन्य मान्यवर यांच्या हस्ते केले होते. दुसÚया पुस्तकाचे प्रकाशन स्वतःच्या वाढदिनी अग्रलेखांचे बादशहा पद्मश्री नीलकंठ खाडीलकर (भाऊ), शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे व अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले होते.
तळमावले : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अष्टपैलू व्यक्तिमत्तव युवा चित्रकार व पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांच्या ‘दीप उजळतो आहे’ या फोटोबायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर शनिवार दि.22 आॅगस्ट, 2020 रोजी सकाळी 9.15 वाजता होणार आहे. वडील श्री.राजाराम डाकवे (तात्या), आई सौ.गयाबाई डाकवे, पत्नी सौ.रेश्मा डाकवे, चि.स्पंदन डाकवे व अन्य कुटूंबीय यांच्या प्रमुख उपस्थितीत हा छोटेखानी समारंभ आयोजित केला आहे.
स्पंदन प्रकाशनाच्या वतीने ‘दीप उजळतो आहे’ हे फोटोबायोग्राफी पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकात शालेय जीवनातील हरहुन्नरी विद्यार्थी ते आतापर्यंतचा संपूर्ण जीवनप्रवास मोजक्याच फोटोेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. बालवाडी ते शालेय शिक्षण, कनिष्ठ महाविद्यालय, एटीडी, वरिष्ठ महाविद्यालय, बीजे-एमजे, ग्राफीक्स डिझायनींग कोर्स इ.आठवणी यात आहेत. शिवाय डाॅ.संदीप डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाचे व विविध संस्थाचे मिळालेेले पुरस्काराचे फोटोंचा यात समावेश आहे. आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला क्षेत्रातील विविध दिग्गज मान्यवरांसमवेतचे फोटो, प्रकट मुलाखतीचे क्षण, कलेमध्ये केलेले विविध प्रयोग, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने आतापर्यंत राबण्यात आलेले सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम, इलेक्ट्राॅनिक मिडीयाकडून घेतलेली दखल इ.गोष्टी यात आहेत. सदर पुस्तक पाहिल्यानंतर काही क्षणातच डाॅ.संदीप डाकवे यांचा जीवनप्रवास अनुभवता येणार आहे.
हा प्रसंग माझ्या जीवनातील आनंददायी व रोमांचकारी असेल. या पुस्तकाची रचना, संकल्पना, मांडणी सर्वांना आवडेल तसेच आईवाडीलांच्या हस्ते याचे प्रकाशन हाही एक वेगळा क्षण असल्याचे मत डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केले आहे.