रूचेश जयवंशी साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी
Published:Jul 22, 2022 03:39 PM | Updated:Jul 22, 2022 03:39 PM
News By : Muktagiri Web Team
साताऱ्याचे गेल्या अडीच वर्षांपासून जिल्ह्याच्या प्रशासनाची जवाबदारी पार पाडणारे जिल्हाधिकारी शेखर सिंह दलाल यांची बदली झाली असून त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रुचेश जयवंशी यांची वर्णी लागली आहे या संदर्भातील नवीन आदेश मंत्रालयातील अप्पर मुख्य सचिव नितीन नितीन गद्रे यांनी बजावले आहेत.
मार्च दोन हजार वीस मध्ये शेखर सिंग दलाल यांनी सातारा जिल्ह्याचा पदभार स्वीकारला होता त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच करोनाची आपत्ती जिल्ह्यावर कोसळली असताना महसूल विभागाची मोठी यंत्रणा हाताशी घेऊन अत्यंत धीरोदात्तपणे शेखर सिन्हा यांनी या महामारी चा मोठ्या धैर्याने मुकाबला केला होता जिल्ह्याचे पुनर्वसनाचे प्रश्न तसेच विविध विकास योजना यांना त्यांनी खऱ्या अर्थाने चालना दिली सातारा शहराची हद्द असो किंवा डीपीडीसी मधील निधी संदर्भातील विविध स्त्रोतांचे बळकटीकरण असो त्याचे मंत्रालयामध्ये उत्कृष्ट सादरीकरण करणारे शेखर सिंह यांची कार्यपद्धती नेहमीच वाखाणली गेली राज्य स्तरावर साताऱ्याचे उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून सुद्धा त्यांचा नावलौकिक झाला.
शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बदली झाल्याचा ई-मेल मंत्रालयातून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाला त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे अकोला येथील व्यवस्थापकीय संचालक रूचेश जयवंशी यांची वर्णी लागली आहे जयवंशी हे 2009च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असून यापूर्वी त्यांनी हिंगोली येथे जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे महिला बालकल्याण आयुक्त म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवला आहे सध्या अकोला येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते काम पाहत होते अत्यंत काटेकोर आणि प्रशासकीय शिस्तीची अधिकारी म्हणून जयवंशी यांची ख्याती आहे येत्या काही दिवसातच जयवंशी आपला पदभार स्वीकारणार असून सातारा जिल्हा प्रशासन त्यांच्या प्रतीक्षेत आहे