‘शहरी लोकांच्या सुविधेसाठी मोठमोठे हॉस्पिटले असतात. मात्र, तुलनेने ग्रामीण भागात आरोग्याच्या अत्याधुनिक सोयी नाहीत. खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून अशा प्रकारच्या चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे,’ असे मत कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले.
वडूज : ‘शहरी लोकांच्या सुविधेसाठी मोठमोठे हॉस्पिटले असतात. मात्र, तुलनेने ग्रामीण भागात आरोग्याच्या अत्याधुनिक सोयी नाहीत. खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून अशा प्रकारच्या चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे,’ असे मत कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले.
वडूज येथील ‘गुरुकृपा क्लिनिक’च्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य चर्चासत्रात ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे, डॉ. बी. जे. काटकर, माजी सभापती संदीप मांडवे, नगराध्यक्ष सुनील गोडसे, पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष भूषण रणभरे, सचिनशेठ माळी, विपुल गोडसे, शहाजी गोडसे, आप्पासाहेब गोडसे, पृथ्वीराज गोडसे, अनिल गोडसे, संदीप गोडसे, महेश काटकर, डॉ. अकबर काझी, किसनराव गोडसे, शिवाजीराव गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशमुख म्हणाले, ‘मनुष्याच्या जीवनात चांगले आरोग्य ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या काळात वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकीही जोपासावी. डॉ. गोडसे व सहकार्यांनी राबविलेल्या सर्व विधायक उपक्रमांना पाठबळ दिले जाईल.’
दादासाहेब गोडसे म्हणाले, ‘शहरात राबविण्यात येत असलेल्या विधायक कामासाठी तरुणांनी एकत्र येणे गरजेचे आहे. चांगले काम करणार्या आपल्या माणसांची लोकांनी पाठराखण करावी.’
या कार्यक्रमास शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. एन. जाधव, संभाजी गोडसे, दीपक गोडसे, अशोकराव बैले, नामदेव फडतरे, पोपट पाटील, ज्ञानेश्वर गोडसे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. रोहन गोडसे यांनी स्वागत केले. चंद्रकांत कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. आर. जे. गोडसे यांनी आभार मानले.