सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई
Published:Dec 06, 2021 07:07 AM | Updated:Dec 06, 2021 07:07 AM
News By : Muktagiri Web Team
सातारा जिल्हा बॅंकेचा अध्यक्षपदी वाई सोसायटी गटातून बिनविरोध झालेले कै. लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांचे चिरंजीव व आ. मकरंद पाटील यांचे बंधू नितिन काका पाटील याची वर्णी लागलेली आहे. तर उपाध्यक्षपदी औद्योगिक, विणकर, मजूर संस्था, पाणीपुरवठा संस्था मतदारसंघातून बिनविरोध झालेले अनिल देसाई यांची बिनविरोध निवड लागलेली आहे. आज अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडी अगोदर जिल्हा बॅंकेत कमराबंद चर्चा झाल्या. यामध्ये सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, छ. खा. उदयनराजे भोसले, छ. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, संचालक शिवस्वरूपराजे खर्डेकर, माजी आ. प्रभाकर घार्गे, प्रदिप विधाते आदी उपस्थित होते. अध्यक्षपद भाजप कि राष्ट्रवादी यामध्ये कोणाकडे राहणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले होते. अखेर राष्ट्रवादीच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. तर माण- खटावचे तालुक्यातील अनिल देसाई यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.