दातेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गौरी नीलेश पवार तर उपसरपंचपदी रंजना काशिनाथ जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निमसोड : दातेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गौरी नीलेश पवार तर उपसरपंचपदी रंजना काशिनाथ जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
माजी सरपंच राज हांगे, ज्येेष्ठ कार्यकर्ते शंकरराव मोरे, गणपतराव हांगे यांच्या नेतृत्वाखालील विष्णुदेव ग्रामविकास पॅनेलने सात पैकी सहा जागा जिंकून ग्रामपंचायत पुनश्च एकदा आपल्या ताब्यात ठेवली आहे. तर विरोधी गटास केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. चंद्रकांत हांगे, चंद्रकांत डांगे, अश्विनी शिंदे, काजल देसाई आदींनी सरपंच, उपसरपंच निवडीसाठी सहकार्य केले.
यावेळी चंद्रकांत निकम, दादासो मोहिते, बाबासो पवार, तात्यासो निकम, महादेव कदम, सदाशिव हांगे, ज्ञानदेव हांगे, रझाक पठाण, राजेंद्र चव्हाण, शरद चव्हाण, पोपट तुपे, तुकाराम निकम, गोरख जाधव, राजेंद्र डांगे, महादेव डांगे, हजिषा पटेल, हुसेन पठाण, मुकुंद शिंदे, सत्यवान जवीर, सत्यवान माळवे, गुलाब तुपे, ग्रामसेवक समीर शेख आदींसह मान्यवर उपस्थित होते.
निवडीनंतर विष्णुदेव पॅनेलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.
माजी सरपंच राज हांगे यांनी पाठीमागील पाच वर्षात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा सादर केला. तर नवनिर्वाचित पदाधिकार्यांनी विकासकामांची गती यापुढच्या काळातही कायम ठेवावी. पदाधिकार्यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. तर नूतन सरपंच पवार, उपसरपंच जाधव यांनी सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावात विकासकामे करणार असल्याचे सांगितले.