म्हसवड ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने हर घर झंडा या उपक्रमाची जनजागृती अंतर्गत माण तालुका शिक्षण विभाग, म्हसवड नगरपरिषद व सर्व प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर व सिनियर कॉलेज मधील विद्यार्थी विद्यार्थीनी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा प्रचार ,प्रसार व्हावा याची जनजागृती करण्यासाठी म्हसवड परिसरातील सर्व शाळांतील सुमारे साडे चार हजार विद्यार्थ्यांची म्हसवड शहरातुन भव्य दिव्य आज पर्यंतच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य लेझीम, गजी नृत्
म्हसवड ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने हर घर झंडा या उपक्रमाची जनजागृती अंतर्गत माण तालुका शिक्षण विभाग, म्हसवड नगरपरिषद व सर्व प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर व सिनियर कॉलेज मधील विद्यार्थी विद्यार्थीनी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा प्रचार ,प्रसार व्हावा याची जनजागृती करण्यासाठी म्हसवड परिसरातील सर्व शाळांतील सुमारे साडे चार हजार विद्यार्थ्यांची म्हसवड शहरातुन भव्य दिव्य आज पर्यंतच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य लेझीम, गजी नृत्य, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज, आदी विविध धर्मियाची वेशभूषा केलेले विद्यार्थी, मराठा मोळ्या नऊ वार साडी, कपाळ मळवट भरलेल्या, फेटा घातलेल्या मुली लेझीम, गजी ढोल, बॅन्ड, आदी व घोषणांनी प्रभातफेरी काढण्यात आली.या फेरीला सर्व शाळांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता
यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे .स्वातंत्र्य मिळून 75 वर्षझाली असून सर्व देशभर हा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्याचे अवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आहे त्यानुसार माण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सर्जेराव पाटील,गटशिक्षणाधिकारी माणिक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर झंडा या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी म्हसवड बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मण पिसे यांनी प्रभातफेरी चे आयोजन केले.
म्हसवड नगर परिषद चे मुख्यधिकारी सचिन माने,केंद्रप्रमुख बाळासाहेब पवार, कृषि विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वभर बाबर,म्हसवड चे स पो नि बाजीराव ढेकळे, मुख्यध्यपक प्रवीण दासरे प्राचार्य जेडी मासाळ मुख्याध्यापक माने, प्राचार्य विठ्ठल लवटे , बाळासाहेब पवार, राजाराम खाडे आदी शेकडो शिक्षक यांच्या उपस्थितीत म्हसवड नगरपालिके पासून सुरुवात झाली. तद्नंतर एसटीस्टँड, सातारा पंढरपूर रोड,रामोशी वेस कमान, शिवाजी चौक, सिध्दनाथ मंदिर,रथ पटांगण मार्गे पुन्हा नगरपरिषद या मार्गे स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत ,म्हसवड परिसर दुमदुमून गेला .
विशेष म्हणजे घोड्यावर बसलेली झाशीची राणी,बँड पथक,लेझीम हे सर्व आनंददायी वातावरणात चालले होते, विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे न्यू इंग्लिश स्कुल विरकरवाडी येथिल मुलींचे गजी नृत्य प्रभातफेरीचे खास आकर्षण ठरले .सूत्रसंचालन राजाराम तोरणे यांनी केले
रॅलीतील विद्यार्थ्याना वाहतूक कोंडीचा मनस्ताप, नागरिकांत संतापाची लाट
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने हर घर झंडा या उपक्रमाची जनजागृती घरोघरी व्हावी व नागरीकांनी दिनांक 13/8/2022 ते 15/82022 या तिन दिवसी आपल्या घरावर तिरंगी झेंडा लावून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्याचा महोत्सव देशात साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान यांनी केल्या प्रमाणे आज म्हसवड मध्ये सर्व शाळातील जवळ जवळ साडे चार हजार विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते विद्यार्थी रस्त्याने चालत जाणार होते हे म्हसवड पोलिसांना व पालिकेला नियोजना प्रमाणे माहीत असताना बस स्थानक, वेस, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महावीर चौक, नाथ मंदिर चौकात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती मात्र हि कोंडी सोडवण्यास पोलिसच नसल्याने रॅलीतील विद्यार्याना या वाहतुक कोंडीचा त्रास झाला
साडे पाच तासात रॅलीतील विद्यार्याना खाऊ सोडा एक ग्लास पाण्याची सोय हि पालिका व शिक्षण विभाग करु शकला नाही
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृत रॅली काढण्यासाठी प्रत्येक शाळांनी आपले विद्यार्थी सकाळी सात वाजता शाळेत बोलवले तेथून पालिके समोर व तेथून शहरातुन रॅली काढली व या रॅलीचा समारोप बाजार तळावर दुपारी 11.30 वाजता संपन्न झाली या साडे पाच तासात विद्यार्थांना खाऊ सोडा साधे एक ग्लास पाण्याची हि सोय पालिका करु शकली नाही वा शिक्षण विभाग करु शकला नसल्याने पालकांत नाराजी पसरली आहे
अमृत महोत्सव रॅलीत अहिंसा तर्फे बॅच वाटप
हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत म्हसवड येथे निघालेल्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तच्या रॅलीतील शिक्षक शिक्षिका कर्मचारी न.प.मुख्याधिकारी डॉ.सचिन माने, शिक्षण विस्तार अधिकारी पिसे साहेब,राजाराम तोरणे,या सर्वांना अहिंसा पतसंस्थेच्या वतीने तिरंगा बिल्ले माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितिन दोशी , संचालक प्रितम शहा, बाबू मुल्ला ,आनंदा लिंगे,नाना मासाळ यांचे हस्ते लावण्यात आले यावेळी राष्ट्रभक्ती गिते लावण्यात आली होती.