कोरोनाच्या पूर्वी लग्न थाटामाटात साजरी केली जात होती. लग्न म्हटले की बँड-बाजा आलाच. नाच गाणे आले. लग्न काय पुन्हा पुन्हा होतंय का? हौसेला मोल नाही त्यामुळे लग्नात भरमसाठ खर्च केला जायचा. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळायचा. त्यावर अनेकांची कुटुंब चालायची. मात्र, गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातल्यामुळे बँड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
निढळ : कोरोनाच्या पूर्वी लग्न थाटामाटात साजरी केली जात होती. लग्न म्हटले की बँड-बाजा आलाच. नाच गाणे आले. लग्न काय पुन्हा पुन्हा होतंय का? हौसेला मोल नाही त्यामुळे लग्नात भरमसाठ खर्च केला जायचा. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळायचा. त्यावर अनेकांची कुटुंब चालायची. मात्र, गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातल्यामुळे बँड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
बँड व्यवसाय हा त्यापैकीच एक व्यवसाय. समाजासाठी जीवनावश्यक नाही पण ज्यांचे पोट त्याच्यावर आहे, त्यांच्यासाठी रोजी-रोटीचे साधन. आणि हीच रोजी-रोटी कोरोनामुळे हिरावून घेतली आहे. गेली वर्ष भर बँड व्यवसाय ठप्प आहे. आणि या व्यवसायावर अवलंबून असणार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. बँडमधील मंडळी म्हणजे कलाकार, गायक वादक आदी अनेक प्रकारचे कलाकार बँड व्यवसायला लागतात.आता इतके वर्ष बँड व्यवसायामध्ये काम केल्यामुळे, दुसरा कोणता व्यवसाय करणे शक्य नाही. त्यामुळे बँड व्यवसाय करणार्यांची पूर्ण कोंडी झाली आहे. आपले घर कसे चालवायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने धान्य दिले तरी बाकीच्या खर्चाचे करायचे काय?, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आम्ही गेली 30 वर्षे बँड व्यवसायामध्ये आहोत.आमच्याकडे 2 बँडचे संच आहेत व 40 च्या आसपास कलाकार आहेत. त्यातून वर्षाला अंदाजे 10 लाख उत्पन्न मिळते. व या व्यवसायावर 40 ते 50 माणसांचे कुटुंब चालते. कर्ज काढून आम्ही अंदाजे 25 ते 30 लाखाचे भांडवल या धंद्यात गुंतवले आहेत. पण गेल्या वर्षभरात कोणतेही उत्पन्न मिळाले नाही. देणी अडकली आहेत.कर्ज थकली आहेत. ही 40-50 कुटुंब आमच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे शासनाने आमच्या व्यथा समजून घ्यावेत व आम्हाला किमान जगण्यासाठी तरी मदत करावी. कर्ज मुदत वाढवून मिळावी. कर्जाचे व्याज माफ करावे. आम्हाला कलाकार मानधन द्यावे, अशी मागणी व मत निढळ (ता. खटाव) येथील प्रसिद्ध बँड व्यावसायिक अमोल बँडचे मालक अमोल भोंडवे यांनी केली आहे.