व्यसनमुक्ती हीच खरी राष्ट्र भक्ती : किशोर काळोखे

Published:Aug 04, 2022 07:22 PM | Updated:Aug 04, 2022 07:22 PM
News By : Satara
व्यसनमुक्ती हीच खरी राष्ट्र भक्ती : किशोर काळोखे

सोनवडी : तारुण्यात असलेली उर्मी आणि ऊर्जा याचे रूपांतर राष्ट्रभक्तीत करायची असेल तर व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा आपले हितरक्षण करते.स्वतः वरचे व देशाचे प्रेम ही भक्ती जोपासायची असेल तर व्यसनमुक्ती हीच राष्ट्रभक्ती होय हे लक्षात घेणे असे मत परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेचे प्रकल्प समन्वयक व सामाजिक कार्यकर्ते किशोर काळोखे यांनी व्यक्त केले.