वडूज : विखळे ता. खटाव येथील फाट्या नजीक मोटार सायकला कुत्रा आडवा आल्याने अपघात झाला . या अपघातात येलमरवाडी येथील शेतकरी सुरेश केदारी बागल ( वय - ४० ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला .
याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की , येलमरवाडी ता. खटाव येथील सुरेश केदारी बागल हे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आटपाडी तालुक्यातून येलमरवाडी येथे मोटार सायकल वरून येत असताना विखळे फाटा येथे कुत्रा आडवा आला . सदर अपघातात सुरेश बागल हे गंभीर जखमी झाले . जखमी सुरेश बागल यांना अधिक उपचारासाठी वडूज ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले . त्यांच्या पश्चात आई पत्नी , एक मुलगा , दोन मुली असा परिवार आहे .सदर घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास महिला पोलिस नाईक पूनम जगदाळे करीत आहेत .