मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, 15 जानेवारी 2026ला मतदान होणार असून, 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. आजपासून सर्व महापालिकांमध्ये आचारसंहित लागू करण्यात आल्याचं निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहीर केलं आहे.
असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम -
अर्ज दाखल करण्याचा कालावधी - 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
अर्जाची छाननी - 31 डिसेंबर
उमेदवारी माघारीची मुदत - 2 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम यादी - 3 जानेवारी 2026
मतदान - 15 जानेवारी 2026
मतमोजणी - 16 जानेवारी 2026