कराड नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणातून गुरुवारी पाच उमेदवारांनी माघार घेतली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत उद्या शुक्रवार, दि. २१ दुपारी तीन वाजेपर्यंत पर्यंत आहे.
निवडणूक शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग २ ब मधून विनायक कदम (अपक्ष), प्रभाग ३ अ मधून वंदना देशमुख (अपक्ष), प्रभाग ६ अ मधून सपना ओसवाल (अपक्ष), प्रभाग ७ ब मधून अभिषेक बेडेकर (अपक्ष) व प्रभाग १५ ब मधून श्रीधर फुटाणे (अपक्ष) यांनी आपले उमेदवारी अर्ज कराड नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडून मागे घेतले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी शिंदे व प्रशांत व्हटकर उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उद्याचा शुक्रवार एक दिवस बाकी आहे. उद्या आणखी काही उमेदवार आपले अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवार, दि. २१ रोजी किती उमेदवार आपले अर्ज मागे घेणार याकडे कराडकरांचे लक्ष लागले आहे.