माझे वडील धर्मेंद्र यांची तब्येत स्थिर आहे. आम्ही विनंती करतो की, आमच्या या कठीण काळात आम्हाला प्रायव्हसी द्याल.. तुमच्या प्रार्थनांसाठी आभार...अशी पोस्ट ईशा देओलनं शेअर केली आहे. तर हेमा मालिनी यांनी देखील धर्मेंद्र यांच्या निधानाच्या वृत्तांवर नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त आहे. त्यांच्या निधनासंदर्भात वेगवेगळ्या चर्चासुरू आहेत. त्यांच्या कुटुंबियांकडून मात्र अद्याप या वृत्तावर भाष्य करण्यात आलं नाहीये.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकती खालावली होती. त्यानंतर त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल सायंकाळीपासून त्यांची प्रकृती खालावल्याचं वृत्त होतं. यानंतर सलमान खान, शाहरुख खान सह अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली होती.
आज पहाटे धर्मेंद्र याचं निधन झाल्याचं वृत्त आलं होतं. मात्र हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लेक ईशा देओल यांनी मात्र निधनाचं वृत्त फेटाळलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती आहे.