मतमोजणी कक्षात मोबाईल बंदी... बैठकी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी मतमोजणी कक्षात नियुक्त कर्मचारी व उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना मोबाईल आणता येणार नाही अशी सक्त सूचना केली. तसेच नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना व त्यांच्या नियुक्त प्रतिनिधींना ओळखपत्र देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
कराड, दि.17 : कराड नगरपरिषद मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत व्हटकर, नायब तहसीलदार विश्वजितसिंह राजपूत,
सहायक महसूल अधिकारी युवराज पाटील, प्रवीण पवार, संगणक ऑपरेटर शिवराज माळी उपस्थित होते.
यानिमित्त आयोजित मतमोजणी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देताना ते म्हणाले, आत्तापर्यंत अतिशय छान व चांगले असे काम सर्वांनी केले आहे, त्याबद्दल सर्वांचे कौतुक आहे. परंतु मतदान प्रक्रियेतील सर्वात महत्वाचे आणि अत्यंत जबाबदारीचे काम म्हणजे मतमोजणीचे असून सर्वांनी अत्यंत जबाबदारीने ते पार पाडावयाचे आहे.
मतमोजणी नियोजनासंदर्भात ते म्हणाले, एकूण 15 टेबलवर मतमोजणी होणार असून सर्वासधारण 4/5 राऊंड मध्ये मतमोजाणी पूर्ण होईल. ते पुढे म्हणाले, यासाठी 65 वर कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून नियुक्त कर्मचाऱ्याशिवाय एक उमेदवार/ प्रतिनिधी अथवा मतमोजाणी प्रतिनिधी आतमध्ये असेल. अध्यक्षपदासाठी प्रत्येक प्रभागासाठी एक प्रतिनिधी असेल. दरम्यान आज प्रभाग 15 ब साठीच्या पुढे ढकलण्यात आलेल्या मतदानासाठी 8 मशिन्स तयार करण्यात आल्या असून 3 मशिन्स राखीव ठेवण्यात आल्याची माहिती निवडणूक कक्षातून देण्यात आली.