उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथील विमानतळावर लँडिंगदरम्यान ही घटना घडली. या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची आज बारामतीमध्ये चार सभा होणार होत्या. त्यासाठी ते आज सकाळी विमानाने बारामतीमध्ये आले होते. मात्र, लँडिंगदरम्यान विमानाला अपघात झाला. धावपट्टीवरून विमान बाजूला गेले. या अपघात अजित पवार यांच्यासह काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांचे पीए आणि काही जण सोबत असल्याची माहिती आहे.