कराड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी २२ तर नगरसेवक पदासाठी तब्बल ३३० अर्ज दाखल

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवक पदासाठी १५८ अर्ज दाखल
Published:Nov 17, 2025 08:10 PM | Updated:Nov 17, 2025 08:43 PM
News By : Muktagiri Web Team
कराड नगरपालिकेच्या  निवडणुकीसाठी  नगराध्यक्ष पदासाठी २२ तर नगरसेवक पदासाठी तब्बल ३३० अर्ज दाखल

उद्या १८ नोव्हेंबरला छाननी कराड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने १० ते १७ नोव्हेंबरदरम्यान दाखल झालेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी उद्या १८/११/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्र, शनिवार पेठ, कराड येथे होणार आहे. प्रथम नगराध्यक्ष पदाची, त्यानंतर प्रभाग क्रमांक १ ते १५ ची क्रमवार छाननी होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले.