मलकापूर पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी १५ तर नगरसेवकांसाठी तब्बल १३३ अर्ज
सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी दोन तर नगरसेवक पदाचे ३५ नवीन अर्ज दाखल
News By : Muktagiri Web Team
मलकापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. १७ नोव्हेंबर) नगराध्यक्ष पदासाठी आज २ अर्ज तर नगरसेवक पदासाठी तब्बल ३५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. कालपर्यंत आलेल्या १३ अर्जांसह नगराध्यक्ष पदासाठी एकूण १५ अर्ज, तर नगरसेवक पदासाठी कालपर्यंत दाखल ९८ अर्जांमध्ये आजचे ३५ मिळून एकूण १३३ अर्ज दाखल झाले आहेत.
सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी विक्रम बाबुराव मोरे – भाजप, अक्षय संदीप मोहिते – शिवसेना दोन अर्ज दाखल झाले आहेत तर नगरसेवक पदासाठी प्रभाग 1अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव कांचन सारंग लोहार – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रब्बाना अझरुद्दीन शेख – शिवसेना प्रभाग 2अ – सर्वसाधारण महिला राखीव वंदना दत्तात्रय साळुंखे – अपक्ष, 2ब – सर्वसाधारण भीमाशंकर इराप्पा माऊर – अपक्ष , प्रभाग 3अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव धनंजय शामराव येडगे – भाजप, हणमंत कृष्णत पुजारी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, 3ब – सर्वसाधारण महिला राखीव सुवर्णा श्रीकृष्ण शिंदे – भाजप, सुवर्णा श्रीकृष्ण शिंदे – अपक्ष, प्रभाग 4अ – अनुसूचित जाती राखीव सागरनाथ बापू तडाके – भाजप, 4ब – सर्वसाधारण महिला राखीव आनंदी मोहन शिंदे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रभाग 5अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव शुभांगी दिगंबर माळी – भाजप शुभांगी दिगंबर माळी – अपक्ष, राणी मंगेश सुरवसे – भाजप, सारिका प्रशांत गावडे – भाजप, 5ब – सर्वसाधारण ऋषिका रवींद्र यादव – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, प्रभाग 6अ – अनुसूचित जाती महिला राखीव काजल अक्षय माने – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, 6ब – सर्वसाधारण संदीप बबन मुटल – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रविकिरण शंकर शेवाळे – भाजप, पंकज मोतीराम शेवाळे – भाजप, अधिकराव वसंतराव बागल – अपक्ष, प्रभाग 7अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव दीपलक्ष्मी दीपक नार्वेकर – भाजप, 7ब – सर्वसाधारण सुहास राजाराम कदम – भाजप, हर्षवर्धन हणमंत जाधव – भाजप, दिनेश दीपक नार्वेकर – भाजप , प्रभाग 8अ – अनुसूचित जाती महिला राखीव प्रज्ञा विनायक दरागडे – भाजप, छाया हणमंत भोसले – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , 8ब – सर्वसाधारण चंद्रकांत रंगराव लाखे – भाजप, अक्षय दादासो पाटणकर – शिवसेना, प्रभाग 9ब – सर्वसाधारण महिला राखीव गौरी सचिन निगडे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रभाग 10अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव श्रीकांत तात्यासो येडगे – भाजप, अक्षय अजित माळी – भाजप, प्रशांत विजय पोतदार – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, 10ब – सर्वसाधारण महिला राखीव स्नेहल सत्यवान पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , प्रभाग 11अ – सर्वसाधारण महिला राखीव छाया अर्जुन येडगे – अपक्ष, वैशाली वैभव पाटील – अपक्ष यांनी अर्ज दाखल केले आहेत
मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांचा आकडा मोठा असल्यामुळे. आता छाननी, अर्ज मागे घेणे आणि अंतिम यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


