मलकापूर पालिकेसाठी रविवारी 4 नगराध्यक्ष तर 20 नगरसेवकपदाचे अर्ज दाखल
News By : Muktagiri Web Team
मलकापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत आज, रविवार दि. 16 नोव्हेंबर रोजी उमेदवारांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. नगराध्यक्ष पदासाठी 4 तर नगरसेवक पदासाठी 20 असे एकूण 24 अर्ज दाखल झाले. आजअखेर नगराध्यक्ष पदासाठी 13 आणि नगरसेवक पदासाठी तब्बल 98 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.
नगराध्यक्षपदासाठी आज दाखल झालेल्या चार अर्जांत भास्कर सुबराव सोळवंडे (भाजप), अरुणकुमार जयराम सकटे (भाजप), संजय तुकाराम तडाके (काँग्रेस), मुकुंद निवृत्ती माने (राष्ट्रवादी काँग्रेस ) यांचा समावेश आहे. यापूव दाखल झालेल्या 9 अर्जांसह आता नगराध्यक्षपदासाठी अर्जांची संख्या 13 वर पोहोचली आहे. यामुळे मुख्य पदाच्या निवडणुकीत चुरस वाढण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
नगरसेवक पदासाठी आज विविध प्रभागांतून एकूण 20 अर्ज दाखल झाले. आजअखेरच्या आकडेवारीनुसार नगरसेवक पदासाठी यापूवचे 78 आणि आजचे 20 मिळून एकूण 98 अर्ज जमा झाले आहेत. अनेक प्रभागांत राखीव गटांमधील महिलांची उमेदवारीही लक्षणीय असून स्पर्धा अधिक रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहेत.
प्रभागनिहाय आज दाखल झालेले अर्ज
प्रभाग 1 अ : कांचन सागर लोहार (अपक्ष)
प्रभाग 2 अ : वैदेही विजय पवार (भाजप), विजया प्रताप सूर्यवंशी (भाजप), विजया प्रताप सूर्यवंशी (अपक्ष), कल्याणी विनायक सूर्यवंशी (अपक्ष) 2ब : विक्रम अशोक चव्हाण (भाजप)
प्रभाग 3 अ : राजू कासम मुल्ला (भाजप)
प्रभाग 4 ब : आनंदी मोहन शिंदे (भाजप)
प्रभाग 5 अ : नयना राजन वेळापुरे (भाजप), राजश्री राजेंद्र पोतदार (भाजप) 5ब : निरंक
प्रभाग 6 अ : उषा प्रकाश वाघमारे (भाजप), 6ब : अधिकराव वसंतराव बागल (भाजप)
प्रभाग 7 ब : आनंद बाळासो बागल (भाजप), अंजली विजय रैनाक (भाजप)
प्रभाग 8 ब : अक्षय दादासो पाटणकर (अपक्ष)
प्रभाग 9 अ : भारत बाळासाहेब जंत्रे (भाजप) 9ब : कल्पना दीपक काळे (भाजप)
प्रभाग 10 अ : आरती प्रमोद गावडे (भाजप)
प्रभाग 11 अ : सुप्रिया महेश मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस पाट), 11ब : महेश रामचंद्र मोहिते (अपक्ष)


