कराड नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी ३ अर्ज दाखल तर नगरसेवकपदासाठी ५० अर्ज दाखल
रविवार सुट्टीच्या दिवशीही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
News By : Muktagiri Web Team
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नव्हते परंतु निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या सूचनेनुसार उद्या रविवारी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. - अतुल म्हेत्रे, निवडणूक निर्णय अधिकारी कराड नगरपरिषद
कराड :
कराड नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शनिवार दिनांक १५ रोजी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचा श्रीगणेशा होऊन ३ अर्ज दाखल झाले. तर आज नगरसेवक पदासाठी एकूण ५० अर्ज दाखल झाले.
अशी माहिती कराड नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.
आज नगराध्यक्ष पदासाठी शरद रामचंद्र देव यांनी अपक्ष तर झाकीर मौला पठाण यांनी राष्ट्रीय काँग्रेस मधून एक तर अपक्ष म्हणून एक अर्ज आज दाखल केला.
नगरसेवक पदासाठी प्रभाग १ ब नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून सुदर्शन विष्णू पाटसकर (भाजप), राहुल दीपक पाटील (भाजप), शंतनु विष्णू पाटसकर अपक्ष (अपक्ष), प्रभाग २ अ सर्वसाधारण महिला गटातून नीलम विनायक कदम यांचा एक अर्ज (भाजप) व दुसरा (अपक्ष), पद्मजा मिलिंद लाड (अपक्ष), भाग्यश्री विशाल साळुंखे (भाजप), प्रभाग २ ब सर्वसाधारण गटातून सोनाली सुनील नाकोड (भाजप), सुहास संभाजी पवार यांनी एक अर्ज लोकशाही आघाडीतून तर दुसरा अपक्ष म्हणून दाखल केला आहे. तर विनायक विलासराव कदम यांनी एक अर्ज भाजप तर दुसरा अपक्ष म्हणून दाखल केला. प्रभाग ३ अ सर्वसाधारण महिला गटातून सारिका विक्रमसिंह देशमुख (जनशक्ती आघाडी), निकहत जमीर नदाफ (अपक्ष) , प्रभाग ३ ब सर्वसाधारण गटातून जावेद बाबू शेख (अपक्ष), प्रभाग ४ ब अनुसूचित जाती गटातून विवेक रमेश भोसले (भाजप), प्रभाग ५ अ सर्वसाधारण महिला गटातून अर्चना अशोक पाटील (काँग्रेस), प्रभाग ६ अ सर्वसाधारण महिला गटातून सानिया अमजत मुतवल्ली (अपक्ष), प्रभाग ७ अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला गटातून प्रिया सुहास आलेकरी एक अर्ज भाजपमधून तर दुसरा अपक्ष म्हणून दाखल केला आहे. प्रभाग ७ ब सर्वसाधारण गटातून घनश्याम त्रिंबक पेंढारकर (भाजप), विनायक सदानंद मोहिते यांनी एक शिवसेनेतून तर दुसरा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. तर जयंत दत्तात्रय बेडेकर यांचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल झाला आहे. प्रभाग ८ अ सर्वसाधारण महिला गटातून तेजस्विनी विक्रमसिंह डुबल (भाजप), प्रभाग ८ ब नागरिकांचा मागास प्रवर्गातून संजय चंद्रकांत चन्ने (भाजप), शैलेंद्र शरद गोंदकर (भाजप) व अतुल अनिल बारटक्के यांनी एक भाजपमधून तर दुसरा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. प्रभाग १० अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला गटातून मनीषा किरण मुळे (भाजप), प्रभाग १० ब सर्वसाधारण गटातून समाधान बबन चव्हाण (भाजप) विनोद बाबासो चव्हाण (भाजप),
प्रभाग ११ अ अनुसूचित जाती महिला गटातून वैष्णवी रमेश वायदंडे यांनी एक अर्ज भाजपमधून तर दुसरा अपक्ष म्हणून दाखल केला आहे. शुभांगी अमोल भोसले (अपक्ष), प्रभाग ११ ब सर्वसाधारण गटातून अमर कृष्णत यादव (अपक्ष), गणेश भीमराव पवार (भाजप), अभिषेक राजेंद्र भोसले (भाजप), अक्षय शिवाजी सुर्वे यांनी एक अर्ज राष्ट्रीय काँग्रेसमधून तर दुसरा अपक्ष म्हणून दाखल केला आहे. तर धनश्री गणेश पवार (अपक्ष) अर्ज दाखल केला आहे. प्रभाग १२ अ सर्वसाधारण महिला गटातून शितल अजय सूर्यवंशी (अपक्ष), प्रभाग १२ ब सर्वसाधारण गटातून गणेश शिवाजी कापसे (अपक्ष), जय बाजीराव सूर्यवंशी (अपक्ष) व अजय भास्कर सूर्यवंशी (अपक्ष) प्रभाग १३ ब सर्वसाधारण गटातून आशुतोष सुभाष डुबल (भाजप) गिरीश बाबूलाल शहा (भाजप) शिवराज रामचंद्र कोळी (भाजप) सिद्धांत जयवंतराव पाटील (अपक्ष ), प्रभाग १५ ब नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग गटातून विश्वनाथ वसंतराव फुटाणे (भाजप), अकिल फकरुद्दीन आंबेकरी (राष्ट्रीय काँग्रेस) आदी ५० जणांनी आपले उमेदवारी अर्ज सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कराड नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत व्हटकर यांच्याकडे दाखल केले.


