जर आपण देखील केसांच्या समस्येने त्रस्त असाल, तर आपण काळ्या तिळाचे तेल वापरू शकता. काळ्या तिळाचे तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. ज्यांना तेल लावायला आवडत नाही, ते काळ्या तिळाचा वापर करू शकतात. या तीळात मॅग्नेशियम, प्रथिने, व्हिटामिन ई, कॅल्शियम आणि ओमेगा-3चे पोषक घटक असतात.
प्रत्येकाला गडद आणि दाट केस आवडतात. दाट केस आपले व्यक्तिमत्त्व वाढवण्याचे कार्य करतात. परंतु व्यस्त जीवनशैलीमुळे केसांची काळजी घेणे थोडे अवघड झाले आहे. यामुळे कोरडेपणा, रुक्ष केस, कोंड्या समस्या, केस गळणे आणि केस पांढरे होणे, या समस्या सामान्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न येतो की, ही केस गळती कमी करण्यासाठी नेमके काय केले पाहिजे. जर आपण देखील केसांच्या समस्येने त्रस्त असाल, तर आपण काळ्या तिळाचे तेल वापरू शकता. काळ्या तिळाचे तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. ज्यांना तेल लावायला आवडत नाही, ते काळ्या तिळाचा वापर करू शकतात. या तीळात मॅग्नेशियम, प्रथिने, व्हिटामिन ई, कॅल्शियम आणि ओमेगा-3चे पोषक घटक असतात. चला तर, केसांमध्ये हे तिळाचे तेल कसे वापरावे, ते जाणून घेऊया
अशाप्रकारे करा ’काळ्या तिळा’चा वापर :
- विशेषत: उन्हाळ्याच्या हंगामात बहुतेक लोकांना तेल लावायला आवडत नाही. जर, आपले केस पांढरे झाले असतील, तर काळ्या तिळाचे मूळ आणि त्याच्या पानांचा काढा करून, तो केसांच्या मुळाशी लावा. यामुळे आपले केस पांढरे होणार नाहीत.
डँड्रफ
डोक्यातील कोंडापासून मुक्त होण्यासाठी, तिळाची फुले व गोक्षुर समान प्रमाणात घेऊन त्याची पेस्ट बनवा. नंतर या पेस्टमध्ये तेल आणि मध मिसळ. ही पेस्ट हेअर मास्क म्हणून लावा. किमान एक तास तरी हा मास्क राहू द्या, नंतर शॅम्पूने केस धुवा. लांब आणि जाड केसांसाठी
जर आपले केस काळे, लांब व जाडे व्हावे असे वाटत असेल, तर काळ्या तीळात तितकेच कमळ केशर, जेष्ठमध आणि आवळा मिसळून बारीक पेस्ट तयार करा. यानंतर या पेस्टमध्ये मध घाला. ही पेस्ट हेअर मास्क म्हणून लावा आणि नंतर केस शॅम्पूने धुवा.
केसांची चमक वाढवण्यासाठी तिळाचे तेल
रुक्ष आणि निर्जीव केस कोणालाच आवडत नाहीत. जर, तुमचेही केस रुक्ष असतील आणि तुम्हालाही तुमच्या केसांची चमक वाढवायची असेल, तर आठवड्यातील दोन दिवस, झोपण्यापूर्वी केसांच्या स्काल्पमध्ये आणि मुळांमध्ये तिळाच्या तेलाने चांगला मसाज करा.