निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांचे सातारा येथे आगमन
जिल्हा परिषदेच्या मैदानावर भव्य संत सामगम
Published:Mar 09, 2023 01:14 PM | Updated:Mar 09, 2023 01:14 PM
News By : Muktagiri Web Team
सातारा : संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक प्रमुख सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक कल्याण यात्रेवर येत असून त्यांच्या पावन सानिध्यात येथील जिल्हा परिषद मैदानावर मंगळवारी (ता. 14 मार्च) रोजी सायंकाळी पाच ते नऊ या वेळात एक दिवसीय विशाल निरंकारी संत समागमाचे आयोजन करण्यात आले आहे याबरोबरच या दिव्य जोडीचे महाराष्ट्रातील अध्यात्मिक कल्याणात्रेचा शुभारंभ होईल सातारा येथील जिल्हा परिषद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय कार्यक्रमाची ही मालिका अशीच पुढे चालू राहणार असून 15 मार्च रोजी महाड, 16 मार्च रोजी रत्नागिरी आणि 17 मार्च रोजी सांगली येथे अशा स्वरूपाचे कार्यक्रम होणार आहेत त्यानंतर हे दिव्य युगुल गोवा येथे 19 मार्च रोजी आयोजित संत समागमासाठी प्रस्थान करेल संत निरंकारी मंडळाच्या सातारा झोनचे प्रभारी प्रभारी नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक दीपक शेलार, बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांच्या सहकार्याने रविवारी 12 मार्च रोजी कार्यक्रम स्थळावर या संत समागमाच्या पूर्वतयारीचा प्रारंभ करण्यात येणार आहे. 14 मार्च ला होणाऱ्या यां सामगमाचा तमाम निरंकारी अनुयायांनी लाभ घ्यावा असे आवाहनही श्री. झांबरे यांनी केले आहे.