वडाचे झाड कोसळून वाहतूक विस्कळीत

वळसे नजीकची घटना; झाडाखाली सापडलेल्या वाहनांचे नुकसान 
Published:Apr 04, 2021 06:11 PM | Updated:Apr 04, 2021 06:43 PM
News By : Muktagiri Web Team
वडाचे झाड कोसळून वाहतूक विस्कळीत

पुणे- बंगळूर  महामार्गावर वळसे (ता. सातारा) गावानजीक आज दुपारी वडाचे जुने झाड रस्त्यावर कोसळले. त्याखाली एक दुचाकी व बोलेरो जीप सापडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, महामार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली.