‘कष्ट आणि परिश्रमाच्या बळावर मिळवलेल्या अफाट विद्वत्तेमुळे जगातील सर्वात बुद्धिमान विद्यार्थी म्हणून ओळख असणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मौलिक ग्रंथसंपदा प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासली पाहिजे, हीच बाबासाहेबांना खरी मानवंदना ठरेल,’ असे प्रतिपादन रमाई चरित्र लेखक बाळासाहेब कांबळे यांनी मायणी येथे केले.
मायणी : ‘कष्ट आणि परिश्रमाच्या बळावर मिळवलेल्या अफाट विद्वत्तेमुळे जगातील सर्वात बुद्धिमान विद्यार्थी म्हणून ओळख असणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मौलिक ग्रंथसंपदा प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासली पाहिजे, हीच बाबासाहेबांना खरी मानवंदना ठरेल,’ असे प्रतिपादन रमाई चरित्र लेखक बाळासाहेब कांबळे यांनी मायणी येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी अॅड. एकनाथ जाधव म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायद्याचे अभ्यासक होतेच आणि ते उत्कृष्ट पत्रकार सुद्धा होते. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत ही पत्रे सुरू करून आपल्या लेखणीतून उपेक्षित वर्गाच्या व्यथा मांडल्या.
याप्रसंगी विकास सकट, राज बहुद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष राजाराम कचरे, सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र माईनकर, सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य सचिव शैलेंद्र वाघमारे यांनीही मनोगते व्यक्त केली.
या कार्यकमास अजय झोडगे, दत्तात्रय सरतापे, अमर झोडगे, संजय कांबळे, जगदीश कांबळे, नितीन (पिंटू) झोडगे, अविनाश निकाळजे, विशाल चव्हाण, अमोल भिसे आदी उपस्थित होते.
डॉ. रामचंद्र कांबळे यांनी सामुदायिक त्रिशरण पंचशील, भीमवंदना घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.