कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन परिसरात आज दुपारी दोनच्या सुमारास अवकाळी पावसाची हजेरी लावत अक्षरशः गारांचा पाऊस झाला आहे. रस्त्यावर आणि शेतात बर्फाचा खच साठला होता. मात्र, गारपिटीमुळे कांदा उत्पादक, कलिंगड व द्राक्षबागांबरोबर इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन परिसरात आज दुपारी दोनच्या सुमारास अवकाळी पावसाची हजेरी लावत अक्षरशः गारांचा पाऊस झाला आहे. रस्त्यावर आणि शेतात बर्फाचा खच साठला होता. मात्र, गारपिटीमुळे कांदा उत्पादक, कलिंगड व द्राक्षबागांबरोबर इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. आज दुपारी दोनच्या सुमारास मेघगर्जना व सुसाट वार्याने अवकाळी पावसाला सुरुवात झाली. सुमारे पाऊण तास झालेल्या पावसामध्ये गारपीट पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. रस्त्यावर गारांचा थर झाला होता. तर घराच्या छतावर, शेतात गारांचा मोठा खच साचला होता. या गारपिटी पावसात वाहनधारकांना सुमारे अर्धा तास वाहन चालविणे मुश्कील झाले होते.
मात्र, या बर्फाच्छादित दृश्यांमुळे वाहन चालकांना जम्मू-काश्मीरमध्ये आल्यासारखे दृश्य काही वेळ झाले होते.हवामान विभागाने या अगोदरच दोन दिवस पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवला होता. काल जिल्ह्यामध्ये काही भागांत पाऊस पडतो आहे, तर काही भागात नुसता गारांचा पाऊस होत असल्याचे चित्र दिसत आहे. आज दुपारी या भागात अवकाळी पाऊस झाला, यामध्ये संपूर्ण रस्त्यावर बर्फच बर्फ दिसत होता. अक्षरशः या गारपिटी पावसाने अर्धा ते एक फूट शेतात व रस्त्यावर बर्फ साठला होता. वाहन चालकांना आपण काश्मीरमध्ये जात असल्याचे भास होत असला तरी या गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या फळबागांचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे यापूर्वीच सर्वसामान्य शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच वाठार स्टेशन व काही पिंपोडे बुद्रुकच्या परिसरात आज झालेल्या गारपीट पावसाने द्राक्ष, कलिंगड, केळी बागांसोबत गोट कांदा उत्पादकांचे या गारपिट कहरामुळे मोठे नुकसान झाले असण्याची दाट शक्यता व चिंता व्यक्त केली जात आहे.