पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भुयाचिवाडी ता. कराड गावाच्या हद्दीत सातार कडून कराड दिशेने जाणाऱ्या लेंनवर दुधाच्या टँकरच्या धडकेने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली असून टँकरच्या ड्रायव्हरने घटनास्थळ पलायन केले आहे. दरम्यान, घटनास्थळीवरून मिळालेली माहिती अशी, युनिकॉर्न गाडी (क्रमांक MH50 R 7711) या गाडीस अन्यात वाहनाने धडक दिल्याने मोटरसायकल चालक समाधान गंडू कांबळे (वय 42, मूळ गाव सोलापूर, सध्या राहणार उंब्रज ता. कराड) याचा जागीच मृत्यू झाला समाधान कांबळे हे अपशिंगे तालुका सातारा येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून काम करत होते. घटना स्थळीउंब्रज पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले असून अपघाताविषयी माहिती घेण्याचे काम चालू होते.