महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
वडूज/पुसेसावळी : महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या भाग्यश्री भाग्यवंत व संतोष कदमसह सर्व शिक्षकांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, गरिबांचे वाली, आबालवृद्धांचे तारणहार, सर्वांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आमचे प्रेरणास्थान आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे एकमेव राजे होते. असे राजे पुन्हा होणे नाही, असे मत मुख्याध्यापक भाग्यश्री भाग्यवंत यांनी व्यक्त केले.
यावेळी घाडगे, संभाजी कदम, घार्गे, ढोले, जाधव, पवार, वेदपाठक, खाडे, अमित कदम, घार्गे, ग्रंथपाल व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.