जागतिक महिला दिनानिमित्त फलटण उपविभाग अंतर्गत फलटण शहर पोलीस ठाणे येथे फलटण उपविभाग अंतर्गत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
फलटण : जागतिक महिला दिनानिमित्त फलटण उपविभाग अंतर्गत फलटण शहर पोलीस ठाणे येथे फलटण उपविभाग अंतर्गत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, फलटण विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. के. किंद्रे, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सपोनि एन. आर. गायकवाड, सपोनि एस. के. राऊळ, पोलीस उपनिरीक्षक वाचक भानुदास पवार यांनी फलटण शहर पोलीस ठाणे येथे सकाळी 8 ते 9 या वेळेत सायकल रॅलीत आयोजन करण्यात आले होते.
फलटण उपविभागातील महिला पोलीस अंमलदार व्ही.पी. भोसले, म. पो. हवा ए. डी. फरडे, म. पो. शि, म. पो. हवा एस. व्ही. खाडे, म.पो.हवा शुभांगी धायगुडे, म. पा. हवा. सुनीता बोडके, म.पो.ना रूपाली भिसे, म.पो.हवा मंगल हेंद्रे, म.पो.शि संध्या वलेकर, म.पो.हवा उर्मिला पेंदाम, म. पो.ना वैशाली जाधव, म.पो.ना साधना कदम, म.पो.शि शरीफा मुलाणी या सायकल रॅलीत सहभागी झाल्या होत्या.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक ए. डी. फरडे, दुसरा क्रमांक व्ही.पी. भोसले व तिसरा क्रमांक खाडे यांचा आला. त्यांचा सत्कार करून त्यांना बक्षीस देण्यात आले. त्यानंतर सकाळी 10 ते 11 या दरम्यान मुधोजी हायस्कूल फलटण मधील विद्यार्थिनींना निर्भया पथका मार्फत पोलीस ठाण्याचे कामकाज कोणत्या प्रकारे चालते, शस्त्रांची ओळख तसेच वायरलेस सेट वरून नियंत्रण कक्षास कॉल देण्याबाबतची माहिती देण्यात आली.
सायंकाळी 6 ते 8.30 या वेळेमध्ये पोलीस वसाहतीतील महिला तसेच बडी कॉप, महिला सुरक्षा समितीतील महिलांना, महिला पोलीस अंमलदारांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
फलटण शहर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल ते महिलांच्या हातातून हिसकावून नेल्याचे असल्याने ते गुन्हे उघडकीस आल्याने त्यातील सहा फिर्यादी यांना बोलावून घेऊन त्यांचे मोबाईल त्यांना परत देण्यात आले. यावेळी फिर्यादी महिलांनी पोलिसांनी कशा प्रकारे सहकार्य केले, याबाबत माहिती देऊन पोलिसांचे आभार मानले.
सर्व कार्यक्रम कोरोनाच्या अनुषंगाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून पार पाडण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पो. कॉ नाळे यांनी केले.