कराड ः शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोहिते यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. सातारा जिल्ह्यात चळवळीचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. सेनेचा एक सच्चा कार्यकर्ता, सर्वसामान्यांचा नेता गमावल्याची भावना शिवसैनिकांतून व्यक्त होत आहे. बुधवारी पहाटे संजय मोहिते यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी कृष्णा रुग्णायात दाखल करण्यात आले होते.
संजय मोहिते यांनी १९९० ते २०१० या कालावधीत कराड शहरात शिवसेनेच्या माध्यमातून विविध आंदोलने, मोर्चे काढले होते. गेली पंचवीस वर्षेहून अधिक काळ मोहिते यांनी शिवसेनेत आक्रमकतेने काम केले. एक आक्रमक व धडाडीचा यूवा कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती. संजय मोहिते यांच्या पश्चात आई, पत्नी व मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.