कराडातील दोघांना जिल्ह्यातून एक वर्षाकरीता हद्दपार
Published:4 y 9 m 1 d 15 hrs 36 min 16 sec ago | Updated:4 y 9 m 1 d 15 hrs 33 min 56 sec ago
News By : Muktagiri Web Team
कराड : सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवाया मोडीत काढण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्याकरीता अभिलेखावरील गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करण्याकरीता कराड शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील दोघांना सातारा जिल्ह्यातून एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले. अमित हणमंत कदम सध्या (रा. होली फॅमिलीच्या पाठीमागे, वैभव कॉलनी, विद्यानगर, ता. कराड, मूळ रा. अंतवडी, ता. कराड) व शेखर उर्फ बाळू प्रकाश सूर्यवंशी (रा. हजारमाची-ओगलेवाडी, ता. कराड) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवाया मोडीत काढण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्याकरीता अभिलेखावरील गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करण्याकरीता पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी हद्दपार प्राधिकरण यांना प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावावर हद्दपार प्राधिकरण यांनी सुनावणी घेऊन अमित कदम व शेखर उर्फ बाळू सूर्यवंशी या दोघांना एक वर्षाकरीता सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. कराड शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याकरीता पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कराड शहरातील गुन्हेगारी टोळींच्या हालचालीवर विशेष पथककरवे व गोपनीय यंत्रणेकरवे लक्ष केंद्रीत करून कारवाई सत्र सुरू आहे. त्यामध्ये आजपर्यंत गुन्हेगारी तीन टोळ्या व इसम यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 व 56 अन्वये कराड तालुक्यातून व सातारा जिल्ह्यातून 2 डझनपेक्षा अधिक लोकांना शहरातून हद्दपार केलेले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस हवालदार नितीन येळवे, पोलीस नाईक संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, विनोद माने यांनी केलेली आहे.