दिवसेंदिवस खटाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, आज एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शास्त्रीनगर येथील बाधित रुग्णांचा परिसर सील केला आहे.
खटाव : दिवसेंदिवस खटाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, आज एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शास्त्रीनगर येथील बाधित रुग्णांचा परिसर सील केला आहे.
यामध्ये याच कुटुंबातील 50 वर्षीय पोलीस कर्मचार्यांचा अहवाल काल पॉझिटिव्ह सापडला होता. कोरेगाव येथे कर्तव्य बजावत असतानाच ते बाधित सापडले आहे. तसेच खटाव मधीलच एक व्यापारी (वय 40) पाहुणचारासाठी सासरवाडीला गेला होता. तिकडेच तो बाधित झाला आहे. त्याला सातारा येथे खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे.
या बाधित रुग्णांची माहिती मिळताच सरपंच नंदकुमार वायदंडे, बीडीओ काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युन्नूस शेख, डॉ. थोरात यांनी बाधित परिसराची पाहणी करून प्रशासकीय कार्यवाही केली.