येथील महावितरणच्या उपविभाग अंतर्गत वडूज शहर शाखा अंतर्गत थकबाकीदार ग्राहकांकरिता वीजबिल धडक वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. वीजबिल भरा नाहीतर वीज पुरवठा तत्काळ खंडित या धोरणानुसार प्रत्यक्ष ग्राहकांची भेट घेऊन व ग्राहकास ऑनलाइन प्रणालीद्वारे वीजबिल भरण्यास प्रेरित करून थकीत ग्राहकांचे वीजबिल भरून घेण्यात येत आहे. तसेच थकीत वीजबिल न भरणार्या ग्राहकांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करण्यात येत आहे.
वडूज : येथील महावितरणच्या उपविभाग अंतर्गत वडूज शहर शाखा अंतर्गत थकबाकीदार ग्राहकांकरिता वीजबिल धडक वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. वीजबिल भरा नाहीतर वीज पुरवठा तत्काळ खंडित या धोरणानुसार प्रत्यक्ष ग्राहकांची भेट घेऊन व ग्राहकास ऑनलाइन प्रणालीद्वारे वीजबिल भरण्यास प्रेरित करून थकीत ग्राहकांचे वीजबिल भरून घेण्यात येत आहे. तसेच थकीत वीजबिल न भरणार्या ग्राहकांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करण्यात येत आहे.
या वसुली मोहिमेत मंडल कार्यालयातील सर्कल टीममधील संतोष भोसले, उपव्यवस्थापक (विवले) राजेंद्र मोरे, उच्चस्तर लिपिक (लेखा) यांच्यासह वडूज उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता कलशेट्टी, शाखा अभियंता देसाई व सर्व जनमित्र यांनी उत्स्फूर्तपणे काम केले.
पावडे, मुख्य अभियंता, बारामती परिमंडळ, गायकवाड, अधीक्षक अभियंता सातारा मंडल व मुंडे कार्यकारी अभियंता, वडूज विभाग यांनी दिलेल्या सूचना व प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे वीजबिल वसुलीचे काम चालू करण्यात आले आहे.
तरी सर्व घरगुती व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांनी आपले थकीत तसेच चालू वीजबिल तत्काळ भरून महावितरणला सहकार्य करावे, अशी विनंती महावितरणतर्फे करण्यात येत आहे. तसेच थकीत ग्राहकांचा वीजपुरवठा थकीत वीजबिल न भरल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता मुंडे यांनी केले आहे.