कराड : कराडात ऑनलाईन सातबारा उतार्रावर नाव दुरुस्ती करण्यासाठी कराडचे तलाठी सागर पाटील यानी 40 हजारांची लाच मागितलयाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आल्याने पुन्हा एकदा कराड तलाठी कार्यालय चर्चेत आले आहे.
कराड : कराडात ऑनलाईन सातबारा उतार्रावर नाव दुरुस्ती करण्यासाठी कराडचे तलाठी सागर पाटील यानी 40 हजारांची लाच मागितलयाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आल्याने पुन्हा एकदा कराड तलाठी कार्यालय चर्चेत आले आहे. यापूर्वीही या तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली होती.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराडचे तलाठी सागर पाटील यानी तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यानी खरेदी केलेल्या सर्वे नंबर 348/3 या प्लॉटवर तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांचा ऑनलाइन सातबारा उतार्यावर नाव दुरुस्ती करण्यासाठी तलाठी यांनी 40 हजारांची मागणी केली होती.
संबंधित मागणीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणीही केली होती. यानंतर संबंधित विभागाचे सातारा पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पो. ना. प्रशांत ताटे, विशाल खरात या पथकाने ही कारवाई केली आहे. यानुसार कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.