कराड : दुचाकी चोरट्यास पोलिसांनी पकडले
News By : Muktagiri Web Team
कराड ः वाहनांची तपासणी करत असताना एक बुलट चोरीची असल्याचा संशय कर्तव्यावरील हवालदार अमोल पवार यांना आला. त्यांनी संबंधित गाडीचालकाकडे त्याची विचारपुस केल्यावर त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्या गाडीची आरटीओ कार्यालयाकडुन माहिती घेतल्यावर त्याचा मालक वेगळाच असुन ती गाडी चोरीस गेल्याचा फलटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. त्यावरुन संबंधित चोरीच्या बुलटसह संशयीत सलीम ईलाही डांगे (वय 48, रा. मसूर, ता कऱ्हाड) याला ताब्यात घेवुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची माहिती अशी ः पोलिस कर्मचारी अमोल पवार हे पोलिस उपाधिक्षक कार्यालयासमोर कर्तव्यावर असताना वाहतूक नियमन व वाहन चेकिंग करीत होते. त्यावेळी त्यांनी एक काळ्या रंगाची बुलेट थांबवली. त्यावेळी चालकास गाडीच्या कागदपत्राची माहिती विचारुन नाव विचारले. त्यावर त्याने सलीम ईलाही डांगे ना असल्याचे सांगुण कागदपत्राबाबत असामाधानरकारक उत्तरे दिली. त्यामुळे बुलेट चोरीची असावी असा संशय कर्मचारी पवार यांना आला. त्यावेळ त्यांनी त्या बुलेटबाबत आरटीओ कार्यालयाकडुन माहिती घेतली. त्यावेळी वाहनाचा मूळ क्रमांक (एमएच १२ एमडी 0044) असा व सदर बुलेटचे मूळ मालक निवृत्ती साहेबराव सुर्वे (रा भुगांव, पिगरूड, पुणे) असल्याची माहिती मिळाली. अधिक माहिती घेता बुलेट चोरीची असून त्याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यावरु संबंधित चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरीक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उपाधिक्षक अमोल ठाकूर, वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी चेतन मछले, पोलीस उपनिरीक्षक दिपक जाधव यांच्याा मार्गदर्शनाखाली कर्मचारी अमोल पवार यांनी केली.