सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. नुकतेच वन विभागास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगल भागात दिनांक १२ डिसेंबर रोजी वाघाचे पायाचे ठसे मिळाले. सदर बाब फिरती करणाऱ्या वनरक्षक व वनमजूर याला लक्षात येताच त्यांनी तातडीने सदर बाब वनक्षेत्रपाल यांना कळवली. पुढे तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी पायांचे ठसे व विष्टा सापडली. सदर जंगल परिसरातील वन विभागाने लावलेले केमेरा तपासणी केले असता दिनांक १७.१२.२०२३ रोजी पहाटे ४.५९ वाजता वाघाचे फोटो कैद झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर बाब ही अत्यंत आशादायी आहे व सर्व व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी वर्ग यांना सतर्क करण्यात आले आहे. सुरक्षा कारणास्तव ठिकाण गोपनीय ठेवण्यात आलेले आहे