राज्य शासनाच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा 3.0’ अभियानात कराड पालिकेने सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. कराडने इतर पालिकांमध्ये अव्वल ठरत ‘माझी वसुंधरा 3.0’ अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या अभियानात राज्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दरवर्षी जागतिक पर्यावरणदिनी गौरवले जाते. आज या अभियानाचा पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंत्री विखे पाटलांच्या हस्ते कराड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके व पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला.माझी वसुंधरा अभियान 3.0 हे राज्यात दि. 01 एप्रिल 2022 ते दि. 31 मार्च 2023 या कालावधीत राज्यात राबविण्यात आलेले आहे. या अभियानामध्ये राज्यातील 411 नागरी स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला.