कालिकाई, संपर्क ऍग्रोच्या कोट्यवधी फसवणूक प्रकरणी आणखी तीन संचालकांना अटक
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
ठाणे येथे स्थापन झालेल्या कालिकाई व संपर्क ॲग्रो मल्टिस्टेट को.ऑ.सो. या मल्टिस्टेट कंपनीने मुंबई, ठाणे, कोकण पश्चिम महाराष्ट्रसह पाटण तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे पुढे आल्यानंतर. या फसवणूक प्रकरणी गुंतवणूक प्रतिनिधी व गुंतवणूक दारांनी कंपनीच्या संचालक मंडळा विरोधात जिल्हा पोलिस प्रमुख सातारा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या अनुषंगाने सातारा अर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून कंपनीचे चेअरमन अरुण आर गांधी, संचालक आदित्य हेमंत रेडीज यांच्यासह संचालक मंडळातील फरार असलेले आरोपी कंपनीचे संचालक कमलाकर गंगाराम गोरिवले वय ५६, अविनाश परशुराम डांगळे वय ५२, विनोद सहदेव जगताप वय ५९ या तीन आरोपींना सातारा अर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबई येथून शुक्रवारी पहाटे शीताफीने अटक केली. या संशयित आरोपींना कराड येथील विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलिस कस्टडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत गुंतवणूक प्रतिनिधी श्रीमती सुमा गौतम माने व अन्य गुंतवणूकदारांनी सातारा जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार दिली होती. या अनुषंगाने सातारा आर्थिक गुन्हे शाखा जलद गतीने तपास करत असल्याने कालिकाईच्या हजारो गुंतवणूक दारांनी समाधान व्यक्त केले आहे. कालिकाई इंडस्ट्रीज इंडिया लि. आणि संपर्क अॅग्रो मल्टीस्टेट को. ऑपरिटिव्ह सोसायटी लि. ठाणे या एकच फर्म असलेल्या कंपनीने ग्रामीण भागातील गोरगरीब लोकाना अर्थिक गुंतवणूकीच्या दीडपट डबल, तिप्पट परतावा देण्याचे अमिष दाखवून या कंपनीचे जितेंद्र रामचंद्र यादव रा. केर ता. पाटण जि. सातारा (सदया मुंबई) याच्या मार्फत पाटण येथे ऑक्टोंबर २०१२ पासून ते २०१८ अखेर आर्थिक गुंतवणूकीचा व्यवसाय सुरु केला. या कंपनीत गुंतविलेल्या रक्कमेची मुदत संपून चार ते पाच वर्षाचा कालावधी संपून गेला तरी गुंतवलेली रक्कम परत मिळत नसल्याने सातारा जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार देण्यात आली होती. यासाठी कंपनीचे कोअर कमिटी सदस्य जितेंद्र रामचंद्र यादव यासह कंपनीचे चेरमन- अरुण आर. गांधी, व्यवस्थापक संचालक- हेमंत गणपत रेड्डीज, व्यवस्थापक संचालक- मानसी हेमंत रेड्डीज, उत्पादन विभाग प्रमुख- आदित्य हेमंत रेड्डीज, प्रकल्प अधिकारी - अभिनंदन अरुण गांधी संचालक कमलाकर गंगाराम गोरिवले, अविनाश परशुराम डांगळे, विनोद सहदेव जगताप यासंह आणखी आठ संचालकांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल असे सातारा अर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डी. एस. पवार यांनी सांगितले. याबाबत अधिक तपास सातारा जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बंन्सल, अपर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस उपअधीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डी एस पवार, पोलिस उपनिरीक्षक पी आर उमाप, अंमलदार प्रमोद नलावडे, प्रशांत नलावडे, निलेश चव्हाण, संतोष राऊत हे करत आहेत.


