तालुक्यातील विविध क्षेत्रांतील वजनदार व धनिकांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग करणार्या ‘हनी ट्रॅप’ टोळीची फलटण तालुक्यामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू असून, पोलीस विभागही यापुढे अशा टोळ्यांवर कारवाई करण्याच्या मनस्थितीत असून गोपनीय पद्धतीने सर्व प्रकारची माहिती घेण्यासही सुरुवात झाली आहे. पुढील काळात निश्चितच या प्रकारच्या टोळ्यांवर कारवाई होणार आहेत.
फलटण : तालुक्यातील विविध क्षेत्रांतील वजनदार व धनिकांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग करणार्या ‘हनी ट्रॅप’ टोळीची फलटण तालुक्यामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू असून, पोलीस विभागही यापुढे अशा टोळ्यांवर कारवाई करण्याच्या मनस्थितीत असून गोपनीय पद्धतीने सर्व प्रकारची माहिती घेण्यासही सुरुवात झाली आहे. पुढील काळात निश्चितच या प्रकारच्या टोळ्यांवर कारवाई होणार आहेत.
झटपट श्रीमंत होऊन ऐषारामात जीवन जगण्यासाठी, कोणत्याही थराला जात समाजविघातक कृत्य करणार्या टोळ्यांच्या उद्योगापायी फलटण तालुक्याची मात्र राज्यभर पुरती बदनामी होत आहे. बातमी प्रकाशित झाल्यानंतर पोलीस यंत्रणा ही अॅक्टिव्ह मोडवर आली असून, ‘हनी ट्रॅप’च्या आजअखेर लुटीच्या भानगडी पोलीस विभागास माहिती असून, तक्रारदार पुढे येत नसल्याने गुन्हे दाखल करण्यास अडचण येत असून, यापुढे तक्रारदार पुढे आल्यास अशा टोळीच्या मुसक्या आवळल्या जातील, असे पोलीस अधिकार्यांनी सांगितले आहे.
यापूर्वीच पोलीस विभागातील गोपनीय विभागाने या भानगडी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे सादर केल्या असून, टोळीतील काही मोजक्या मंडळींचे कॉल डिटेल्स व लोकेशन पोलिसांनी काढले तर त्यातून या भयानक स्पष्ट होतील. त्यामुळे पोलिसांनी गोपनीय पद्धतीने हे प्रकरण हाताळण्यास सुरुवात केली असून, हनी ट्रॅपच्या मोहजाळात न अडकता सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. यापुढे या टोळीकडून फसवणूक झाल्यास आर्थिक लुटीला बळी न पडता व कौटुंबिक स्वास्थ्य धोक्यात न घालता थेट पोलिसांशी संपर्क साधावा.
‘हनी ट्रॅप’च्या माध्यमातून फलटण तालुक्यातील विविध टोळ्या लूटमार करीत असल्याचे वृत्त दै. ‘मुक्तागिरी’ने शुक्रवारी (दि. 12) प्रसिद्ध केले. दैनिक माध्यमातून हे ‘हनी ट्रॅप’चे वृत्त जगभर पसरले तसेच सोशल मीडियावरही ते तालुक्यासह जिल्ह्यासह जगभर व्हायरल झाले. या बातमीबाबत अनेकांनी दै.‘मुक्तागिरी’चे कौतुक करीत अशा टोळ्यांवर मोक्कांंतर्गत कठोर कारवाईची आग्रही मागणी केली असून, या टोळ्यांच्या ‘पीडितां’कडूनही दै. ‘मुक्तागिरी’ला माहिती देण्यात आली. आर्थिक लूट झालेल्या व्यक्ती काही माहीतगार ही धक्कादायक माहिती व पुरावे देण्यासाठी सरसावले आहेत. काहीजण नाव जाहीर न करण्याच्या अटीवर हनी ट्रॅप टोळीच्या भानगडी थेट जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे मांडणार आहेत. आता याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी स्वतः लक्ष घालून खाकीचा हिसका दाखवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
‘हनी ट्रॅप’मध्ये आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्यास या ‘हनी ट्रॅप’ टोळीवर कडक कारवाई करणार असून, कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता थेट माझ्याकडे तक्रारदार यांनी संपर्क करावा. तक्रारदार यांची नावे गोपनीय ठेवून अशा टोळ्यांवर कडक कारवाई करू.
- तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण.