कराड : तारुख ता. कराड, येथे पांढरीचीवाडी येथील धरे शिवारात सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याची तीन पिल्ले सापडली. याबाबतची माहिती तातडीने शेतकऱ्यांनी पोलीस पाटील सतीश भिसे, वनाधिकारी व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना कल्पना दिली. वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याची पिल्ले ताब्यात घेतली. मादी बिबट्या ही जवळपासच होती व ती चिडून आक्रमक होऊ नये म्हणून वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार सदर तीन पिलांचे आई सोबत मिलन घडवून आणायचे ठरले. त्याप्रमाणे सायंकाळी 6.30 वाजता सदर शिवारात पुन्हा तीन पिल्ले एका क्रेट मध्ये घालून आजू बाजूला केमेरे लावून ठेवण्यात आले. केमेरा लावत असताना बिबट्याची मादी हिने शेजारी दर्शन दिले. ती आजूबाजूला घुटमळत होती. त्यामुळे पिल्ले क्रेट मध्ये ठेवून केमेरा लावून अधिकारी जागेवरून निघाले. सदर कारवाही साठी वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, हेमंत केंजळे, वनपाल बाबुराव कदम, सावखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, भारत खटावकर, राठोड, व इतर वनकर्मचारी उपस्थित होते.